संत ज्ञानेश्वारांनी निर्माण केलेली सापशीडी इंग्रजांनी जगभरात पोहचवली!

Maharashtra today

जगभरात प्रसिद्धीस पावलेल्या साप शीडी खेळाचा अविष्कार भारतात करण्यात आला. हळू हळू या खेळाचा प्रसार जगभरात झाला. प्राचिन भारता हा खेळ घरोघरी खेळला जायचा. या खेळाला ‘मोक्षपट’ (Mokshapat)असं नाव इतिहासात होतं. याऐवजी इतर नावंही होती, ‘लीला’ या नावानं देखील हा खेळ ओळखला जायचा. लीला नाव ठेवण्यामागं ही एक कारण आहे. माणूस पृथ्वीवर जन्म घेत राहतो जोपर्यंत तो वाईट काम करणं बंद करत नाही. असा संदेश खेळाच्या माध्यमातून दिला जातो.

जुन्या काळात ‘ज्ञान चोपड’ या नावानं खेळ ओळखला जाई. ‘ज्ञानाचा खेळ’ म्हणून या खेळाला ओळखलं जातं. हिंदू अध्यात्मानूसार ज्ञान चोपड हाच मुक्तीचा रस्ता आहे. नेहमी नेहमी जन्म घेण्याच्या प्रक्रियेतून मुक्ती हा खेळ देत राहतो. अनेकांना याबद्दल पुर्ण माहिती नाहीये. या खेळाची उत्पत्ती कशी झाली, कुणी केली? मानलं जातं की दुसऱ्या शतकात हा खेळ खेळण्यास सर्वात आधी सुरुवात झाली. जगातल्या सर्वात प्राचिन खेळांमध्ये याचा सामावेश आहे.

इतिहासकारांच्या म्हणण्यानूसार साप- शीडीचा अविष्कार १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी केला होता. माणासाला नैतिक मुल्य शिकवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ( Saint Dnyaneshwar)या खेळाचा अविष्कार केल्याचं बोललं जातं.

संदेश

खेळाच्या रचनेबद्दल बोलयचं तर यात अनेक चौरस असतात. या खेळाच्या अनेक देशांनी स्वतःच्या संस्कृतीप्रमाणं अवृत्त्या बनवून त्या स्वीकारल्या. प्रत्येक चौकट गुण किंवा अवगुण प्रदर्शित करते. ज्या चौकटीत शीडी असते ती चौकट गुण प्रदर्शित करते. ज्या चौकटीत साप असतो ती चौकट वाईट गुण अथवा अवगुण प्रदर्शित करते. भारतीय लहान मुलं हा खेळ जास्त प्रमाणात खेळतात. त्यांच्या बाल्यशिक्षणाचा हा खेळ महत्त्वाचा भाग ठरतो. साप शीडी हा खेळ मुलांना दया, विश्वास आणि विनम्रता शिकवतो आणि वाईट नशिब, क्रोध इत्यादी बाबी हे खेळ दाखवत असतात.

भारता बाहेर ही खेळली जाते साप शीडी

साप शीडी या खेळाला जैन, हिंदू आणि इस्लामिक धर्मांनी आपआपल्या मान्यतांनूसार अंगिकारलंय. पहिल्यांदा हा खेळ कापडावर खेळला जायचा. १८ व्या शतकात पहिल्यांदा साप शीडी खेळण्यासाठी बोर्डचा वापर केला गेला. आजही भारतात पला- सेना काळच्या साप शीडीचं बौद्धिक रुपांतर अस्तित्त्वात आहे. अनेक विद्वानांनी प्रचिन जैन मंडळांशी या खेळाला जोडलंय. परंतू प्रत्येक धर्मात या खेळाचे प्रारुप जसेच्या तसे टिकवण्यात आलंय. १९ व्या शतकात भारतातला हा खेळ व्यापाऱ्यासंबोत इंग्लंडमध्ये पोहचला. इंग्रज त्यांच्या सोबत हा खेळ जगभरात घेऊन गेले.

खेळात काही नियम बनवण्यात आले, काही नियम बदलण्यात आले. ‘स्नेक अँड लॅडर’ या नावानं इंग्लंडमध्ये हा खेळ खेळला जावू लागला. खेळाच्या मागं दडलेल्या धार्मिक मुल्यांना काढून टाकण्यात आलं. साप आणि शिड्यांची संख्या एकसारखी निवडण्यात आली.

इंग्लंडनंतर हा खेळ अमेरिकेत पोहचला. १९४३ मध्ये अमेरिकेत या खेळाला मोठ्या प्रमाणात खेळलं जात होतं. अमेरिकेला ‘मिल्टन ब्रेडले’नं साप शीडी खेळाचा परिचय करवून दिला. तिकंड ‘शुट लॅडर्स’ या नावानं सापसिडी हा खेळ प्रसिद्धीस पावला.

नशिबाचा खेळ

या खेळात तुम्ही जास्त डोकं चालवू शकत नाही. पुर्णपणे नशिबावर हा खेळ अवलंबून आहे. ठोकळा टाकल्यानंतर किती आकडा येतो यावर पुढचा खेळ अवलंबून असतो. तो आकडाच ठरवतो की सोंगटी कितव्या रकाण्यात पुढं जाईल. १०० क्रमांकाच्या आकड्यावर पोहल्यावरच ‘मोक्ष’ मिळतो. या खेळाचा उद्देश असतो, साप आणि शिड्यांमधून मार्ग काढत १०० चा आकडा गाठणे. मोक्षपटामुल्या चौकटी विश्वास, उदारता, ज्ञान इत्यादी गुणांना दाखवत असतात. या खेळाचं एक रुपांतर आंध्रप्रदेशात वैकुंठपाली आणि परमापदा सोपनम नावानं करण्यात आलंय. साप या खेळात मृत्यू दर्शवतो तर शीडी जीवन.

साप शीडी हा खेळ कुणाच्याच आठवणीतून इतक्या सोप्या पद्धतीनं पुसला जाणं शक्य नाही. सहज आणि सोप्प्या खेळातून जगभराला चांगल्या वाईटाची शिकवण देणारा हा खेळ आजही मोबाईल गेमवर खेळला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button