कोल्हापुरातील परिस्थिती चिंताजनक : चंद्रकांत पाटलांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट

Chandrakant Patil

कोल्हापूर : विरोधी पक्षनेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून कोरोना (Corona) महामारीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्य शासनाकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय मदत म्हणून राज्य शासनाकडे 300 कोटींचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले होते. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

याबाबत विचारणा करण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीही भेट घेवून चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.

कोल्हापुरात कोरोना महामारीची स्थिती अत्यंत गंभीर आहे. वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार मिळावेत, यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. फक्त तत्वतः मंजुरी दिली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांवर प्रशासनाने वेळीच उपचार करावेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नये यासाठी भाजप पाठपुरावा करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER