ड्रायव्हरला 70 हजारांची टॅक्सी घेऊन दिली होती या गायकाने

Mohammed Rafi

बॉलिवुड म्हणजे पैशांचा खेळ. तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्ही पैशांच्या राशीत खेळता. यात नायक-नायिकेपासून गायक-गायिकेपर्यंत सगळेच आले. असाच एक अत्यंत यशस्वी गायक. एकेका गाण्यासाठी तो हजारो रुपये घेत असे. मात्र तो कंजूस नव्हता तर उदार हृदयाचाही होता. त्याने त्या काळात स्वतःसाठी अमेरिकेहून आलिशान गाडी मागवली होती. यावरून विचार करा की, त्याच्याकडे किती पैसे असतील ते. तर या गायकाने गाडी घेतली परंतु ती चालवण्यासाठी त्याच्याकडे जो ड्रायव्हर होता त्याला ती गाडी चालवणे शक्य होत नव्हते.

याचे कारण अमेरिकेतील गाड्या या डाव्या बाजूला स्टेअरिंग असलेल्या होत्या आणि सुलतान नावाच्या ड्रायव्हरला डाव्या बाजूने गाडी चालवण्याचा अनुभव नसल्याने तो गाडी चालवू शकत नव्हता. मग या गायकाने डाव्या बाजूने गाडी चालवणारा दुसरा ड्रायव्हर शोधला. यामुळे सुलतान बेकार झाला. मात्र या गायकाला त्याची आणि त्याच्या कुटुंबाची दया आली. मग या गायकाने त्या आपल्या सुलतान नावाच्या ड्रायव्हरला 70 हजार रुपये खर्च करून एक टॅक्सी घेऊन दिली. सुलतानने टॅक्सी चालवणे सुरु केले आणि काही काळातच त्याने एका टॅक्सीच्या कमाईतून तब्बल 12 टॅक्सी घेतल्या आणि तो श्रीमंत झाला. सुलतान आजही आपल्या मालकाला आठवतो आणि नमस्कार करतो. त्याचा मालक होता प्रख्यात गायक मोहम्मद रफी. त्या काळात असे अनेक कलाकार उदार होते आणि अशा प्रकारे ते आपल्या स्टाफला मदत करीत असत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER