शुभंकर पडणार पुन्हा प्रेमात

Shubhankar Tawade

‘सैराट’नंतर (Sairat) रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru) कोणता सिनेमा येणार याची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा नव्या सिनेमात तिचा नायक कोण असणार याचीही झाली. कारण ‘सैराट’मध्ये तिची आकाश ठोसरसोबत (Akash Thoskar) जुळलेली जोडी फूल टू हिट झाली होती. त्यामुळे जेव्हा ‘कागर’ सिनेमाची घोषणा झाली तेव्हा रिंकूसोबत कोण रोमान्स करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले असते. पहिलाच सिनेमा, त्यात रिंकूसारखी फेमस नायिका आणि काय पाहिजे बॉस. ही लॉटरी लागली होती शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) याला. ‘कागर’मधील त्याचा रोमँटिक अंदाज अनेकांना आवडल्याने शुभंकरने पुढचा सिनेमाही रोमँटिक हिरो म्हणूनच करावा अशा अनेक कमेंट त्याच्या चाहत्यांकडून आल्या होत्या. मग काय शुभंकरनेही चाहत्यांची इच्छा मनावर घेत दुसऱ्या सिनेमातही प्रेमात आकंठ बुडणाऱ्या नायकाची भूमिका स्वीकारली आहे.

rinku rajguru: Kaagar Movie Review: Kaagar movie review: This Rinku Rajguru, Shubhankar Tawde-starrer is full of impactful performancesया मालिकेत कोल्हापूरचा पहिलवान गडी सम्राट टीलच्या भूमिकेत दिसलेला शुभंकर आणि पहिल्यावहिल्या सिनेमात हळुवार प्रेम करणारा शुभंकर हे खूप वेगळे होते. लवकरच शुभंकरचा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हा सिनेमा येणार आहे. अजून सिनेमाच्या चित्रीकरणाचा नारळ फुटला नसला तरी शुभंकर या नव्या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुक आहे. एकतर गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सिनेमा इंडस्ट्रीतील लाइट, कॅमेरा, अॅक्शन हा आवाजच बंद आहे. ‘कागर’ या पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळवल्याने शुभंकर खूश होता.

राजकारणातील गैरसमजातून होणारे वाद, त्यात भरडली जाणारी दोन विरोधी पक्षातील तरुणाई, त्यांच्यातील फुलणारे प्रेम अशा अनेक गोष्टींना शुभंकरने ‘कागर’मध्ये मांडले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या सिनेमात पहिली संधी मिळणे हाच ट्रिगर पॉइंट शुभंकरसाठी होता. त्यामुळे आता शुभंकरचा नवा सिनेमा कधी येणार या प्रतीक्षेत त्याचे चाहते होते.

फ्रेशर मालिकेत छोट्या पडद्यावर ओळख मिळवल्यानंतर शुभंकरने संस्कृती बालगुडेसोबत ‘काळे धंदे’ ही वेबसिरीजही केली. शुभंकरची डिजिटल माध्यमातील एन्ट्रीही दणक्यात झाली. या वेबसिरीजमुळे शुभंकर युवतींचा क्रश झाला आणि अर्थातच त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाल्याने तो सध्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. नायक म्हणून ‘कागर’ हा त्याचा पहिला सिनेमा असला तरी ‘डबल सीट’ या सिनेमात अंकुश चौधरीच्या भावाच्या भूमिकेत शुभंकर चमकला होता. ‘नटसम्राट’, ‘गर्वनिर्वाण’ या मराठी नाटकासह ‘जवाब’ या हिंदी नाटकातही शुभंकरची भूमिका आहे. मुंबईतील रुईया कॉलेजमधून जाहिरात हा स्पेशल विषय घेऊन त्याने मास मीडियातील डिग्री घेतली असल्याने आपलं मार्केटिंग कसं करायचं याचं टेक्निक त्याला चांगलच माहीत आहे. शुभंकरला बॅग पॅक करून भटकायला खूप आवडतं. अभिनेता म्हणून डाळ शिजली नसती तर तो देश-परदेशात फिरून ब्लॉग रायटर झाला असता. शुभंकर सांगतो, एकतर या सिनेमासाठी मी उत्सुक असल्याचे कारण म्हणजे लॉकडाऊननंतर हे माझं पहिलं काम आहे.

लॉकडाऊनकाळात आलेली मरगळ झटकून नव्याने कामाला लागण्याची संधी मला या सिनेमाने दिली. दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या नावातच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हे शब्द असल्याने हा सिनेमा तरुणाईची भाषा बोलणारा आहे. आता प्रत्येकालाच मनोरंजनासोबत उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी हव्या आहेत. माझा नवा सिनेमा त्या दृष्टीने टॉनिक असेल हे नक्की शुभंकर या सिनेमात तरुण कवी, गायक आणि गिटारिस्ट मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपण रॉकस्टार बनावं आणि आपले खूप शोज व्हावेत, आपली एक सही घेण्यासाठी भोवती गर्दी जमावी असं स्वप्न पाहणाऱ्या मुलाची ही कथा आहे. शुभंकरने त्याच्या खऱ्या आयुष्यात हे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या सिनेमातील नायक पडद्यावर जरी तरुण नावाच्या मुलाचे जग उलगडणार असला तरी प्रत्यक्षात असेच स्वप्न घेऊन शुभंकर रुपेरी दुनियेत आला आहे.

मराठी सिनेमा, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमांतील अभिनयाचा अनुभव असलेल्या सुनील तावडे यांचा मुलगा ही ओळख घेऊन जरी शुभंकरने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली असली तरी एक मालिका, एक वेबसिरीज, प्रायोगिक आणि स्पर्धेतील नाटकं आणि आता सिनेमा असा एकेक टप्पा पार करत शुभंकर त्याचा दुसरा सिनेमा लवकरच पूर्ण करणार आहे. त्याचा ऑनस्क्रीन रोमँटिक तरुण पडद्यावर गिटार वाजवेल; पण इकडे त्याला फॉलो करणाऱ्या चाहत्यांच्या काळजाची तार छेडली जाईल हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER