लघुपट ‘वारी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

वारी

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेली विठ्ठलाची वारी रद्द करावी लागली. मात्र, विठ्ठल महाराष्ट्रीयनांच्या मनामनात वसला आहे. यंदा वारीला जाता येत नसले तरी वारकर्‍यांनी ही वारी अनुभवावी, विठुरायाच्या भेटीसह त्याचे दर्शन घेता यावे यासाठी सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन विद्यम आर्टस्ने ‘वारी’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. आषाढी एकादशीला म्हणजेच 1 जुलै 2020 रोजी हा लघुपट विद्यम आर्ट्सच्या यू टय़ूबवर प्रदर्शित होणार असल्याचे ‘वारी’चे दिग्दर्शक नीलेश गुरव यांनी सांगितले.

एक वारकरी या लॉकडाऊनमध्ये विठ्ठलाच्या ओढीने वारीला जायला निघतो, पण या प्रवासात त्याच्या सोबत काय काय घडते हा संपूर्ण प्रवास या लघुपटात मांडण्यात आला आहे. या लघुपटाची कथा किशोर नाईक तर पटकथा-संवाद अजिंक्य जाधव यांचे आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन किशोर नाईक आणि नीलेश गुरव (नेरुर) यांनी केले आहे. कला दिग्दर्शन संदेश वालावलकर यांचे आहे. गीतकार डॉ. प्रणव प्रभू असून गायक गणेश मेस्त्राr यांच्या आवाजात संगीतकार दिनेश वालावलकर यांनी संगीतबद्ध केले आहे. या लघुपटामध्ये प्रमुख भूमिकेत नित्यानंद जडये, नितीन जंगम आणि डॉ. प्रणव प्रभू हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER