शॉटसर्कीटने लागली आग; १० दुकाने जळून लाखोंचे नुकसान

Osmanabad Shopping Center Fire - Maharashtra Today

उस्मानाबाद : ढोकी तालुक्यातील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयासमोरील शॉपिंग सेंटरला आज (१४ मार्च) दुपारी शॉटसर्किटने आग लागली. १० दुकाने जळून खाक झालीत. लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान गावकऱ्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अग्निशमनच्या गाड्या पोहचण्याआधीच आग आटोक्यात आली. आमदार कैलास पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. पीडित दुकानदारांना धीर दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER