मालिकांच्या चित्रीकरणाला कोरोनामुळे खो

Nivedita Saraf - Corona Positive

सांगली : मालिका चित्रीकरणाला प्रशासनाने परवानगी देताना ६० वर्षांवरील कोणत्याही कलाकाराला चित्रीकरणात सहभागी होता येणार नाही. अन्य आजाराची बाधा असणाऱ्या कलाकारांना चित्रीकरणासाठी येता येणार नाही, चित्रीकरणामध्ये नियमांचे पालन करावे लागेल. वेळोवेळी सर्वांच्या कोरोना चाचण्या कराव्यात, कलाकारांना राहण्याच्या ठिकाणाचे व ने-आण करणाऱ्या वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे, आदी अटी घालण्यात आल्या होत्या.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Waggaonkar) यांचा कोरोनामुळे (Corona) झालेला मृत्यू झाला. आशालतांसह २७ कलाकारांनाही कोरोनाची बाधा झाली. दुसरीकडे अग्गंबाई सासूबाई मालिकेतील मुख्य कलाकार निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. छोट्या पडद्यावरील मोठ्या मालिका अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

शासनाच्या नियमावलीनुसार योग्य ती खबरदारी घेत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र, तरीदेखील चित्रीकरणाच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही बाब चित्रपट क्षेत्राला हादरून सोडणारी आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या सुमारे २० छोट्या पडद्यावरील मालिका व वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केवळ या मालिकेचे चित्रीकरण स्वत: व्यवस्थापनाने थांबले आहे. या मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची बाधा झाली आणि दुर्दैवाने त्यांचा सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला अवघा एक दिवस उजाडतोय तोच मराठी चित्रपटसृष्टीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली. कोरोना संसर्गामुळे मालिकांच्या चित्रीकरणाला खो बसण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER