
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘मेडे’ (Mayday)या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. रविवारी अमिताभ बच्चन मुंबईत शूटच्या वेळी स्पॉट झाले. सोशल मीडियावर काही फोटोज समोर आली असून त्यात अजय देवगन (Ajay Devgn) आणि रकुल प्रीतसुद्धा अमिताभ यांच्यासोबत शूटिंग लोकेशनवर दिसले.
फोटोंमध्ये अमिताभ बच्चन ब्लॅक सूटमध्ये दिसत आहेत. त्यांच्या हातात काही कागदपत्रे आहेत. त्याचवेळी अजय देवगन बिग बींसमोर पायलटच्या गणवेशात दिसत आहे. पायऱ्यांजवळ उभे राहून आपापसात चर्चा करताना अमिताभ आणि अजय दिसले. या चित्रपटात अजय देवगन पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, अमिताभ यांच्या भूमिकेविषयी अजूनही कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
या दोन्ही स्टार्सनी ७ वर्षांपूर्वी सत्याग्रह चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाविषयी अजून एक ट्विस्ट म्हणजे अजय देवगन हा या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मित करीत आहे. अमिताभ बच्चन हे अजय देवगनच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल. सांगण्यात येते की याआधी अजय देवगन आणि अमिताभ बच्चन यांनी मेजर साहब, खाकी आणि सत्याग्रह सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते.
विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन अखेर गुलाबो सीताबो या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी आयुष्मान खुरानाबरोबर प्रथमच स्क्रीन शेअर केली. मात्र अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अजय देवगन अखेर तान्हाजी चित्रपटात दिसला होता. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रमांची मोडतोड केली.
View this post on Instagram