जानेवारीपासून सुरु होणार ‘बच्चन पांडे’ ची शूटिंग

Akshsay Kmar

अक्षयकुमारचा आणखी एक महत्वाकांक्षी आणि दक्षिण भारतीय चित्रपटावर आधारित ‘बच्चन पांडे’ चित्रपटही आता लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात आले असून जवळ जवळ दोन महिने सलग शूटिंग केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरची भूमिका साकारीत आहे तर कृती सेनन पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दोघांनाही चित्रपटाची आवड असते. अक्षयकुमारला अभिनेता बनायचे असते तर कृतिला दिग्दर्शक व्हायचे असते. एकदा चित्रपट पाहाताना त्यांची भेट होते आणि भेटीची ओळख प्रेमात रुपांतरित होते. हा चित्रपट कॉमेडी अॅक्शन असून याचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहे. गेल्या वर्षी आलेल्या आणि हिट झालेल्या वेलकम 4 चे दिग्दर्शनही फरहादनेच केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 पासून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. यासाठी लोकेशनही शोधण्यात आलेले आहेत. लोकेशनवर शूटिंग करण्यासाठी परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण टीम जैसलमेरमधील पँलेस हॉटेलमध्ये उतरणार आहे. मात्र शूटिंगला जाण्यापूर्वी डिसेंबरमध्ये संपूर्ण टीमची कोरोना चाचणी केली जाणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच सगळ्यांना जैसलमेरला नेणार आहेत. तेथे गेल्यानंतर टीमला तीन दिवस क्वारंटाईनही व्हावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर सेटवर एक मेडिकल टीम कायम ठेवली जाणार आहे. तसेच सेट वर ‘नो-काँटॅक्ट’ आणि सोशल डिस्टन्सिंगवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER