आमिर-करिश्माच्या चुंबन दृश्याचे शूटिंग चालले होते तीन दिवस

Amir Khan & Karishma Kapoor

शशी कपूरच्या सुपरहिट झालेल्या ‘जब जब फूल खिले’च्या कथानकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय लकी मोरानी यांनी घेतला होता. धर्मेश दर्शन यांच्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ‘राजा हिंदुस्तानी’ नावाने चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि चित्रपटाचा नायक-नायिका म्हणून आमिर खान आणि करिश्मा कपूरची निवड करण्यात आली. आमिर आणि करिश्माच्या कारकिर्दीतील हा एक सुपरहिट चित्रपट. 6 नोव्हेंबर 1996 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूरवर एक चुंबन दृश्य चित्रित करण्यात आले होते. हिंदी चित्रपटांमधील हे सगळ्यात मोठे चुंबन दृश्य होते. मात्र या चुंबन दृश्याचे शूटिंग तब्बल तीन दिवस चालले होते.

या चुंबन दृश्यामागची कथा दिग्दर्शक धर्मेश यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘भारतीय चित्रपटांमधील हे सगळ्यात मोठ्या लांबीचे चुंबन दृश्य होते. मी मुद्दामच हे दृश्य मोठेच शूट केले. सेंसॉर बोर्ड या चुंबन दृश्यावर कैची चालवणार आणि ते कमी करणार म्हणून मी ते मुद्दामच मोठे शूट केले. मात्र सेंसॉर बोर्डाने या दृश्यावर कात्री तर चालवली नाहीच चित्रपटालाही ‘यू’ सर्टिफिकेट दिले.

करिश्मा कपूरने या चुंबनदृश्याबाबत बोलताना सांगितले होते, पडद्यावर किसिंग करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. हा एक अत्यंत बोल़्ड सीन होता आणि तो देण्याचा मी धाडसी निर्णय घेतला होता. काही मिनिटांच्या या सीनसाठी आम्ही तीन दिवस तयारी करीत होतो त्यामुळेच हा शॉट एका टेकमध्येच ओके झाला. या किसिंग सीनची खूप चर्चाही झाली होती असेही तिने सांगितले होते.

निर्माता लकी मोरानी यांनी या चुंबन दृश्याबद्दल मागे बोलताना सांगितले होते, चुंबन दृश्य एका टेकमध्ये ओके व्हावे यासाठी आमिर आणि करिश्माबरोबर खूप वेळा आमची चर्चा झाली होती आणि रिहर्सलही करण्यात आली होती. अशा प्रकारचे दृश्य आम्ही तर प्रथमच शूट करीत होतो आणि आमिर करिश्माही पहिल्यांदाच पडद्यावर चुंबन दृश्य देणार होते. परंतु रिहर्सल केलेली असल्यामुळे एका टेकमध्येच शॉट ओके झाला होते असेही मोरानी यांनी सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER