शिवसेनेने अखेर करून दाखवलेच, कर्नाटकात फडकावला भगवा झेंडा

Maharashtra Karnataka Border Dispute

कोल्हापूर :- कर्नाटकात (Karnataka) शिवसेनेने (Shiv Sena) ताकदीने लढत देऊन, पोलिसांच्या झुंडशाहीला झुगारत तेथे भगवा झेंडा फडकावला आहे. बेळगावात शिवसेने अखेर गनिमी काव्याने हा विजय खेचून आणला आहे आणि बेळगावात अभिमानाने भगवा फडकावण्यात शिवसैनिक यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, कन्नड वेदिके या संघटनेने बेळगावसह सीमाभागात भगवे ध्वज लावण्यास विरोध सुरू केला आहे. काही ठिकाणी या संघटनेने स्वत:चे ध्वज लावले आहेत. याला विरोध करत सीमाभागात भगवा ध्वज फडकवण्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यासाठी सकाळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार व संग्राम कुपेकर हे कार्यकर्त्यांसह शिनोळी या गावात पोहोचले. तेथून कर्नाटकात जाताना त्यांना पोलिसांनी अडवले. पोलिसांचा विरोध झुगारत आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस व कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली.

शंभरापेक्षा अधिक कर्नाटक पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे या ठिकाणी अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. काहीही करून सीमाभागात भगवा ध्वज फडकवणार, असा इशारा देत कार्यकर्ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर गनिमी काव्याने कोनेवाडी या गावात घुसून तेथे भगवा फडकवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER