‘या’ उपायांनी वाढवा आपल्या दागिन्यांची चमक

jwellery

दागिने हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे नवीन दागिने घेणे आणि आहे ते दागिने चमचम करत राहावे तसही तिला वाटत असत. त्यासाठी दागिने कोणतेही असू देत कोणतेही धातूपासून तयार झालेले असू देत, ते नीट ठेवून सर्वाधिक आवश्यक आहे. दागिने चमकवण्यासाठी आंबट दही आणि हळदीचे मिश्रण खूप उपयुक्त ठरत. एका jwelleryवाटीत 25 ग्रॅम आंबट दही आणि पाच ग्रॅम हळद घ्या त्यामध्ये सोन्याचे दागिने घाला, अर्धा तास भिजत राहू द्या त्यानंतर हे दागिने टूथब्रश आणि पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ करा. दागिन्यांची चमक वाढण्यास मदत होइल. चांदीचे दागिने हे गहाण धूळ, माती यामुळे लगेचच काळे पडतात. चुना हा एक असा घटक आहे, जो चांदीच्या दागिन्यांची गेलेली चमक परत आणतो. थोडासा चुना पाण्यात मिसळून त्याचा लेप दागिन्यांवर लावावा. साधारण तासाभरात चुना सुकेल त्यानंतर सुकलेल्या चुना ब्रशने झाडून घ्या आणि ओल्या कापडाने पुसून घ्या. बटाटे उकडलेल्या पाण्यातही चांदीचे दागिने चमकू लागतात. याशिवाय आंबट दुधाचाही वापर तुम्ही करू शकता. आंबट दुधात चांदीचे दागिने अर्धा तास भिजत ठेवा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.