मालिकांनी दिली वेगळी ओळख – अभिजीत

Abhijeet Khandkekar

“माझिया प्रियाला प्रीत कळेना ” ते आताची सुप्रसिद्ध ठरलेली ” माझ्या नवऱ्याची बायको ” अश्या दर्जेदार मालिका मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शो मधून अभिनयात पदार्पण करून आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट, मालिका आणि एक बहुपैलू सूत्रसंचालक. अभिनेता अभिजीत खांडककेर (Abhijeet Khandakker) यांचा मराठी इंडस्ट्रीमधला हा प्रवास उल्लेखनीय आहे. मालिकांनी त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मालिका मधल्या विविध भूमिका मधून तो आज ” गुरुनाथ सुभेदार ” हे पात्र तितकंच प्रेमाने साकारतो. काही कलाकारांना अभिनय घडवत जातो तसच काहीसं अभिजीतच सुद्धा आहे. अभिजीत ला त्यांचा मालिकांनी घडवलं आहे. त्यांच्या या खास ” मालिका ” प्रवासा विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ या …..

प्रत्येक रोल हा अभिनेत्या साठी खास असतो तसंच प्रत्येक केलेलं काम हे आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. अभिजीत च्या पहिल्या वहिल्या मालिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचला आणि इथून त्यांच्या मालिकांच्या अद्भुत प्रवासाची गोष्ट सुरू झाली.

ही बातमी पण वाचा : मुक्काम पोस्ट लंडन 

मालिकामुळे त्याला विविध भूमिका साकारता आल्या डेली सोप मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि इथून त्याच्या करिअरची अनोखी दिशा त्याला सापडत गेली. मालिका आणि अभिजीत च नातं का खास आहे हे सांगताना अभिजित सांगतो ” अभिनेता म्हणून माझ्या आयुष्यातला  पहिला शो म्हणजे ‘ महाराष्ट्राचा सुपरस्टार ‘ इथून आम्ही सगळेच कलाकार म्हणून लोकांसमोर आलो. इथून एक कलाकार म्हणून करियरची सुरुवात झाली मग झी सारखं मोठं चॅनेल आणि मग अभिनयासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी इथून शिकत गेलो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मुळे मी प्रकाशझोतात आलो सगळे एक अभिनेता म्हणून ओळखायला लागले. या कार्यक्रमामुळे अभिनय क्षेत्रातील स्ट्रगल कमी झाला मग अनेक ठिकाणी ऑडिशन देणं सुरू राहिलं, दिग्दर्शक आणि काही प्रोडक्शन ला भेटी देणं चालू असताना एकीकडे चित्रपट आणि मालिका साठी ऑडिशन देत असताना मला ” माझिया प्रियाला ” ही मालिका मिळाली. पहिली मालिका मिळणं हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता कारण तेव्हा सासू सुनाच्या मालिका येत असताना त्यात  एखादी रोमॅंटिक मालिका येते आणि लोकांना ही प्रेम कहाणी आवडते आणि लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. मग माझा खऱ्या अर्थाने इथून प्रवास सुरु झाला माझिया प्रियाला नंतर जवळपास ६ वर्ष मी दुसरी मालिका केली नाही. मग या मधल्या काळात इव्हेंट्स , चित्रपट यांच्यासाठी मी निवेदक म्हणून काम केलं. ६ वर्षांनी ” माझ्या नवऱ्याची बायको ” या मालिकेसारखी संधी मला मिळाली आता सव्वा तीन वर्षे ही मालिका करतो आहे. लोकांना सुद्धा ही मालिका आवडते आणि लोकप्रिय ठरते आहे.”

काही मालिका या आपल्या फार जवळच्या असतात तसच अभिजीतच देखील आहे. मालिका मुळे त्यांच्या करियरल ला एक वेगळं वळण मिळालं आणि एक उत्तम अभिनयाचा प्रवास सुरु झाला. मालिका मधून त्याने कधीतरी सूत्रसंचालन देखील केलं अनेक पुरस्कार सोहळे आणि रियालिटी शो चा तो सूत्रसंचालक देखील होता.
निवेदनांच्या प्रवास त्यांच्या कडून ऐकू या …

निवेदक आणि सूत्रसंचालक हे काम आज सुद्धा चालू आहे. सध्या मी अभिनय आणि निवेदक म्हणून काम करतो आहे. मी माझं करियर निवेदनापासून सुरू केलंय. वयाच्या १६ वर्षी एका लोकल वृत्त वाहिनी साठी वृत्त निवेदक म्हणून मी काम केलंय त्यानंतर रेडिया मी पाच ते सहा वर्षे मी काम केलं . अभिनेता होण्याआधी मी विविध मध्यमातून निवेदक होतो. आता टेलिव्हिजन वर आल्यावर अभिनेता आणि निवेदक हे कॉम्बिनेशन तयार होतं तर तेव्हा सारेगमप चे दोन सिजन केले, झी च्या अनेक कार्यक्रमासाठी निवेदन केलं. देशात परदेशात अनेक निवेदनाची काम केली. तर माझ्यात असलेल्या दोन्ही कलामुळे मी अभिनय आणि निवेदक दुहेरी भूमिका बजावतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER