मातोश्री पुरमुक्त राहण्यामागचे रहस्य; मुंबईभर राबवणार तो फॉर्म्युला

CM Thackeray-Mumbai Rain -Formula

मुंबई :  यंदाच्या पावसाने मुंबईची (Mumbai Rain) दाणादाण उडवली. कधीही न तुंबणा-या दक्षिण मुंबईचेही यावेळी हाल झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री (Matoshree) च्या शेजारचे कलानगर मात्र पुरापासून पुर्णपणे सुरक्षीत राहिले. यामागचे रहस्य म्हणजे, येते साकारण्यात आलेले मिनी पंपिंगस्टेशनमुळे येथे पूर येण्यापासून हा परिसर वाचला.

मुंबईत, हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव, क्लिव्ह लँड, गजदर बंद, ब्रिटानिया अशी सहा पंपिंग स्टेशन्स बांधण्यात आली. तर मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन्स बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पर्जन्य वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता ताशी ५० मि.मी. करण्यात आली. मात्र, आजही मुंबईत अशी अनेक ठिकाणं आहेत जे पुरमुक्त झालेली नाहीत.

यावर्षीच्या पावसाळ्यात पाण्याखाली गेलेल्या अशा काही ठिकाणांचा महापालिका अभ्यास करीत आहे. टोकियो शहराच्या धर्तीवर पूरबोगदा बांधून त्यात पावसाचे पाणी साठवण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. मात्र यासाठी किमान तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तत्काळ दिलासा देण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन तसेच फ्लड गेटद्वारे पुराचे पाणी रोखण्याबाबत विचार सुरू आहे.

मातोश्रीच्या शेजारचे पुराचे ठिकाण कलानगर कसे राहिले पुरमुक्त (Matoshri Puramukta)-

वांद्रे पूर्व येथील ४२ छोट्या आणि मोठ्या नाल्यातून पावसाचे पाणी अरबी समुद्रात जाते. मात्र, कलानगर आणि खेरवाडी हे परिसर बशीप्रमाणे असल्याने भरतीच्या वेळी या ठिकाणी पाणी तुंबून राहते. जानेवारी महिन्यात येथे मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. दर मिनिटाला ४९,८०० लीटर पावसाचे पाणी उपसण्याची क्षमता येथील पंपांमध्ये आहे. तसेच सहा फ्लड गेटद्वारे पावसाचे पाणी समुद्रात फेकले जाते. यासाठी महापालिकेने ११ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘मिनी’चा असाच प्रयोग हिंदमाता, गांधी मार्केट आणि परळ अशा काही ठिकाणी केला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER