राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (८ नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल यावर भाष्य केलं. दिवे जरूर पेटवा, फटाके न वाजवा तर उत्तम, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown) झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत .

दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे ठाकरे म्हणाले .

पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना विचारला.

राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे विविध कामांचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER