निवडणूक आयोगामुळेच कोरोनाची दुसरी लाट; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा : मद्रास हायकोर्ट

Election Commission of India - Madras High Court

चेन्नई : गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला देशातील स्थिती नियंत्रणात होती. मात्र चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी मोठमोठ्या सभा घेतल्या. यावरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) व्यक्त केला.

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी (Sanjib Banerjee) यांनी एका सुनावणीवेळी निवडणूक आयोगाला फटकारले. देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तेव्हा तुम्ही परग्रहावर होते का? असा प्रश्न उपस्थित करत तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असल्याचे म्हटले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला. लोकांचं आरोग्य सर्वांत महत्त्वाचं आहे. सांविधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचं स्मरण करून द्यावं लागतं हे आमचं दुर्दैव आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जिवंत असेल तरच ती तिच्या लोकशाही अधिकारचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही कोर्टाने केला आहे. आजची परिस्थिती ही अस्तित्व आणि सुरक्षेची आहे. बाकीच्या बाबी यानंतर येतात, असं न्यायमूर्ती म्हणाले. सुनावणीवेळी आरोग्य सचिवांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने ३० एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button