‘देशातील कोरोनाची दुसरी लाट मोदींची ट्रॅजेडी !’ ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

PM Narendra Modi - Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ‘मोदी-निर्मित ट्रॅजेडी’ आहे, अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी यांनी केली. तसेच, पश्चिम बंगालचे नेतृत्व बंगाल इंजिन सरकारच करेल, मोदींचे डबल इंजिन सरकार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्या एका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजेक्शन मिळत आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लसींचे डोस आणि औषधी परदेशात पाठविली जात आहे. ही निवडणूक पश्चिम बंगालला वाचविण्याची आणि बंगाली मातांचा सन्मान वाचविण्याची लढाई आहे. आपले राज्य बंगाल इंजिन सरकार चालवेल, मोदींचे डबल इंजिन सरकार नाही. आम्ही गुजरातला आपल्या राज्यावर कब्जा करू देणार नाही आणि दिल्लीवरून सरकार चालवू देणार नाही. बंगालवर बंगालच राज्य करेल. भाजप नेते, आपल्या निवडणूक सभांतमधून जनतेला, राज्यात डबल इंजिन सरकार बनविण्याचे आवाहन करत आहेत. याचा अर्थ केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, असा होतो.

यावेळी ममतांनी जनतेला, डावे, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंटच्या (आयएसएफ) आघाडीला मत न देण्याचेही आवाहन केले. यामुळे भाजपचा फायदा होईल. आता भाजप निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांतून कार्यकर्त्यांना घेऊन येत आहे आणि येथील जनतेमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरवत आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेता आपण बेडची संख्या वाढविली आहे. मात्र, मी लोकांना विनंती करेल, की जर कोरोनाची अधिक लक्षणे नसतील, तर त्यांनी घरातच आयसोलेट व्हावे. तसेच हलकी लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना सायंकाळी ६ वाजल्यानंतर मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button