युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट

Europe - Coronavirus Second Wave

फ्रान्स :- युरोपातील (Europe) अनेक देशांमध्ये कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) आली आहे. फ्रान्समध्ये मागील तीन दिवसांत १ लाख ४० हजारांहून अधिक संक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. ही संख्या देशात मार्चच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत दोन महिन्याच्या लॉकडाऊन दरम्यान आलेल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ११ लाख ३८ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. आणि ३५ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना रुग्णसंख्येत फ्रान्स अर्जेंटीना आणि स्पेनला मागे टाकत ५ व्या स्थानी पोहोचला आहे.

स्पेनमध्येही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज (Pedro Sánchez) यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपात्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. स्थानिक स्तरावर रात्री कर्फ्यू लागू केला आहे. आणि काही भागात प्रवास करण्यास बंदीही घालण्यात आली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत १ कोटी १ लाख ५६ हजार ४९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जून आणि जुलैमध्ये ही संख्या कमी झाली होती. १३ जूनला केवळ ११६ रुग्ण आले होते. परंतु, आता रोज जवळपास २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये रोज जवळपास २१ हजार, इंग्लंडमध्ये २० हजार, बेल्जियममध्ये १८ हजार, रशियामध्ये १६ हजार, पोलंडमध्ये १२ हजार, जर्मनी आणि नेदरलँड्समध्येही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.

ही बातमी पण वाचा : कोरोना लस मिळणार सर्वांना मोफत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER