सुष्मिता सेनच्या आर्या वेबसीरीजचा दुसरा सीझन लवकरच येणार

Maharashtra Today

सुष्मिता सेनने (Sushmita Sen) मोठ्या पडद्यावर काम मिळणे कमी झाल्यानंतर स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष दिले होते. पण ओटीटीचे प्रस्थ वाढल्यानंतर आणि अनेक मोठ्या कलाकारांनी ओटीटीवर प्रवेश केल्यानंतर सुष्मितानेही एका वेबसीरीजची ऑफर स्वीकारली. तिची पहिली वेबसीरीज आर्या (Arya webseries)गेल्या वर्षी रिलीज झाली आणि ती प्रचंड लोकप्रियही झाली. या वेबसीरीजच्या शेवटालाच याच्या दुसऱ्या सीझनचे सूतोवाच केले होते. आता या वेबसीरीजचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. याचे कारण म्हणजे सुष्मिताने सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट आणि फोटो.

ष्मिताने बॉलिवूडमध्ये २०१० मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात काम केले होते. त्यानंतर मात्र तिने एकही सिनेमा केला नव्हता. त्यानंतर ती थेट २०२० मध्ये आर्या या वेबसीरीजमध्ये दिसली होती. या वेबसीरीजमध्ये सुष्मिता सेनने एका डॉनच्या मुलीची भूमिका साकारली होती. पतिच्या निधनानंतर ती सगळा व्यवहार आपल्या हातात घेते आणि अनेक अडचणींचा सामना करीत घर सांभाळते. मात्र वेबसीरीजच्या शेवची तिची वाटचाल डॉन बनण्याकडे होणार असल्याचे सूतोवाच केले होते. राम माधवानी दिग्दर्शित या वेब सीरीजमध्ये सुष्मिता सेनसोबत चंद्रचूड सिंह, सिकंदर खेर, नमित दास, मनीष चौधरी, जयंत कृपलानी यांनीही काम केले होते. सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिता एका दरवाजासमोर उभी असल्याचे दिसत असून तिचे केसही विस्कटलेले आहेत. या फोटोला सुष्मिताने कॅप्शन दिली असून त्यात म्हटले आहे, ‘तुमची सगळी भांडणे या गेटच्या बाहेर ठेवा, जर तुम्ही त्या आतमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर… हे युद्ध आहे. मी एका वादळाला येताना पाहात आहे. आरशात. आर्याचा दुसरा सीझन येत आहे ‘ असे म्हणत #आर्या सीजन 2 असा हॅशटॅगही दिला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत २ लाखांच्या वर लाईक्स मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर या फोटोतील सुष्मिताच्या लुकवर बॉलिवूडमधीलही अनेकांनी कमेंट केलेल्या आहेत. सुष्मिताच्या मोठ्या मुलीने रेनीने फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे, ‘ठीक आहे, पण मी हा फोटो मिळवू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER