मोदी सीएम टू पीएम मालिकेचा दुसरा भाग 12 नोव्हेंबरपासून

Erosnow Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा प्रवास विलक्षण आहे. भाजपने (BJP) प्रथमच टाकलेली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सलग तीन टर्म यशस्वीरित्या सांभाळून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधानही झाले. त्यांची दुसरी टर्म सुरु आहे. एखाद्याने मनात ठरवले तर काय करता येऊ शकते ते नरेंद्र मोदी यांच्या जीवनाकडे पाहाताना दिसून येते. त्यांचा हा प्रेरणादायक जीवनप्रवास मोदी सीएम टू पीएम या मालिकेतून दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांसमोर आणण्यात आला होता. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. तीन सीझन असलेल्या या मालिकेचा दुसरा भाग 12 नोव्हेबंर पासून प्रसारित केला जाणार आहे.

इरॉस या कंपनीने तयार केलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन उमेश शुक्ल आणि आशिष वाघ यांनी केलेले आहे. मालिकेत महेश ठाकूर, आशिष शर्मा, फैझल खान, दर्शन जरीवाला, प्राची शहा पंड्या, मकरंद देशपांडे आणि अनंग देसाई यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक चहा विक्रेता, आध्यात्मिक मार्गाने राजकीय वैभव प्राप्त करणारा सामान्य माणूस, देशाची सेवा करण्यासाठी निःस्वार्थपणे आपले जीवन समर्पित करणारा माणूस असे त्यांचे जीवन या मालिकेत दाखवले जाणार आहे. यात त्यांची स्तुतीगीते आणि त्यांच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन दाखवले जाणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती अशा पाच भाषांमध्ये मालिका प्रदर्शित केली जाणार आहे.

महेश ठाकूर यांनी याबाबत बोलताना सांगितले, “केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांनाही पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासाबद्दल कुतूहल वाटते. त्यांचा जीवनप्रवास आपल्या देशासाठी खूपच खास आणि विलक्षण आहे. अशी प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारणे हा माझा सन्मान आहे, मला खात्री आहे की त्यांना संपूर्ण सिरीज आवडेल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER