सात महिन्यानंतर वाजणार शाळेची घंटा

सात महिन्यानंतर वाजणार शाळेची घंटा

कोल्हापूर : कोरोनामुळे गेली सात महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online) पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. अद्याप माध्यमिक शाळा सुरू झाल्या नसल्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये (Schools) 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत आदेश काढले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिले आहेत. कोल्हापुरात माध्यमिकच्या 1050 शाळा असून यात अनुदानित 684 आणि उर्वरित स्वयंअर्थसहायित आहेत. नववी ते बारावीपर्यंत सुमारे सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत.

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. शाळा सॅनिटायझेशन करून देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. पालकांची परवानगी घेण्याबाबत मुख्याध्यापकांसमवेत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. क्वारंटाईन काळात नुकसान झालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना आरोग्यविषयक उपाययोजना करण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाणार आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे. एका बेंचवर एक विद्यार्थी बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER