राज्यातील १७ शहरांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि फोडण्यावर बंदी

Fire Crackers

पुणे : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमीवर राष्ट्रीय हरित लवादाने मोठा निर्णय घेतला आहे. फटाक्यांमुळे (Fire Crackers) होणाऱ्या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. कोरोनाचाही श्वसनाच्या विकारांशी थेट संबंध असल्याने नागरिकांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पुण्यासह देशातील सर्व प्रदूषित शहरांमध्ये या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी घातली असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे. बंदीघालण्यात आलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे.

दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याची दखल घेत दिल्ली, राजस्थान, कर्नाटकसह काही राज्यांनी दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली. याच धर्तीवर इतर राज्यांकडूनही फटाक्यांवर बंदी घालण्यासंदर्भात लवादाकडे याचिका दाखल केल्या होत्या. या संदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या मुख्य न्यायपीठाने हे प्रदूषित शहरांमध्ये फटाके बंदीचे आदेश दिले आहेत.

बंदी घालण्यात आलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या सतरा शहरांमध्ये वर्षभरातील हवाप्रदूषण हे सरासरी मध्यम (मॉडरेट) गुणवत्तेपेक्षा जास्त किंवा सम पातळी नोंदवले जात आहे. त्यामुळे या सर्व शहरात फटाक्यांवर बंदी लागू करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी याची अंमलजावणी करावी असे लवादाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER