देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : शरद पवार

Sharad Pawar - Teacher's Day - Sarvepalli Radhakrishnan

मुंबई : शिक्षकदिन (Teacher’s Day) भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, असे ट्विट शरद पवारांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER