शिवसेनेची भूमिका स्पष्ट, बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर केव्हाच केले – संजय राऊत

Balasaheb Thackeray - Sambhajinagar - Sanjay Raut

मुंबई :- सध्या राज्यात औरंगाबाद (Aurangabad) शहराच संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा मुद्दा शिवसेनेनेच (Shiv Sena) उचलून धरला. मात्र याला काँग्रेसकडून (Congress) विरोध होत सत्तेत एकत्र असूनही काँग्रेसने विरोध केल्याने भाजपने (BJP) शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर केव्हाच केले आहेत. आता केवळ कागदावरच लिहायचे राहिलेले आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे कायमच हिंदूहृदयसम्राट होते. कुठल्याही पक्षाच्या टिप्पणीमुळे त्यांचं स्थान कमी होणार नाही. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही, तसा औरंगजेबही लागत नाही, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा मुद्दा महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सामान किमान कार्यक्रमात नसला तरी, तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून हा प्रश्न सोडवतील. भाजप केवळ राजकारण करत आहेत. नैराश्येपोटी ते शिवसेनेवर आरोप करत आहेत. शिवसेनेची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. संभाजीनगरवरुन शिवसेनेने कधी राजकारण केले नाही, असेही राऊत म्हणाले.

यावेळी त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सामनाचे संपादक रश्मी ठाकरे याना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर राऊत यांनी मिस्कील उत्तर दिले. चंद्रकांतदादा रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार.. अरे बापरे.. ताबडतोब.. भीती वाटते मला, असे म्हणत ते सामना वाचतात हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत दादा कालपर्यंत सामना वाचत नव्हते, आता वाचायला लागले ही चांगली गोष्ट आहे, असे म्हणत टोला लगावला.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचे संभाजीनगर केले, भाजपने वळवळ करु नये – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER