पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Devendra Fadnavis - Pooja Chavan

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात सरकार आणि पोलीस यांची भूमिका संशयास्पद आहे. सरकार आणि पोलिसांचा हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजपाच्या आमदारांना धमक्या मिळत आहेत. याचा उल्लेख करून ते फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला की, भाजपाच्या (BJP) आमदारांना कितीही धमक्या दिल्या तरी ते सत्य बोलत राहणारच.

या प्रकारच्या ध्वनिफीत उपलब्ध झाल्या आहेत तरी सरकार कारवाई का करत नाही? गुन्हे दाखल झाल्यानंतर मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हणून म्हणून गुन्हा दाखल केला जात नाहीये का, असा प्रश्न त्यांनी केला.

शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलेब्रिटीनी केलेल्या ट्विटमध्ये चूक काय आहे? त्याची चौकशी होणार असेल तर आपण या देशात राहतोय की कुठे, असा टोमणा फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) याना मारला. या संदर्भात आज देशमुख यांनी खुलासा केला की, सरकार सेलेब्रिटीनच्या ट्विटची चौकशी करणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणालेत की, आता प्रकरण अंगावर आल्यावर, देशभरातून टीका झाल्यानंतर गृहमंत्री स्टेटमेंट बदलत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER