कोरोनाचा धोका वाढला; नागपुरात बरेच रुग्णालयांत बेड्सची कमतरता!

covid center in india - Maharastra Today

नागपूर :- कोरोनाने देशात पुन्हा हाहाकार घालायला सुरुवात केली. देशात पाच महिन्यांनंतर एकाच दिवसांत ५० हजारहून जास्त रुग्ण समोर आले. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. नागपुरात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्णालयांत बेड्सची कमतरता जाणवत आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. २४ मार्चला नागपूर (Nagpur)  जिल्ह्यात जवळपास ३ हजार ७०० रुग्ण समोर आले. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे. सध्या नागपुरात एकूण ३४ हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर GMC च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘रुग्णालयांत ६०० बेड्स आहेत. मात्र, यांपैकी ९० बेड्स बेसमेंटमध्ये आहेत. हे बेड्स ड्रेनेजच्या समस्येमुळे बंद करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत होतो. त्यानंतर आता बेड्स मिळू शकले आहेत.’

३१ मार्चपपर्यंत लॉकडाउन

या पार्श्वभूमीवर नागपुरात ३१ मार्चपपर्यंत लॉकडाउन केला आहे. केवळ नागपूरच नाही, तर बीड आणि नांदेडमध्येही संपूर्ण लॉकडाउनचा आदेश दिला आहे. याशिवाय इतरही शहरांत लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यूसारखी बंदी घालण्यात आली आहे.

रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी

देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५०४.४ दिवसांवरून २०२.३ दिवसांवर आला आहे. १ मार्चला हा कालावधी ५०४ दिवस होता. २३ मार्चला २०२ दिवस पूर्ण झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या ८०.९० टक्के आहे. २२ मार्चला ३२.५३ लाखांहून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये २ हजार २९९ रुग्ण आहे. गुजरातमध्ये १ हजार ६४० रुग्ण सापडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER