कोरोनाशी लढण्यासाठी योग्य हेतू, धोरण हवे, निरर्थक गोष्ट नाही; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi & PM Modi

नवी दिल्ली :- काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’वर निशाणा साधला आहे. कोरोनाशी (Corona) लढायचे असेल तर योग्य धोरण, योग्य हेतू  आणि दृढनिश्चय हवा. महिन्यातून एकदा होणाऱ्या ‘निरर्थक बात’ची गरज नाही, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी ट्विट करून केली आहे.

आज मोदींनी ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला. याच मुद्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “कोरोनाशी लढायचे असेल तर योग्य धोरण, योग्य हेतू आणि दृढनिश्चय हवा. महिन्यातून एकदा ‘निरर्थक बात’ करण्याची गरज नाही.” असे ट्विट राहुल यांनी केले आहे. मोदींची खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांच्या खात्यातील कोणताही मंत्री कोणत्याही विषयावर बोलत असतो. ती त्यांची मजबुरी आहे, असेही ते म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button