आशिया खंडातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एक बंजारा होता!

Maharashtra Today

लख्खीराय बंजारा, (Banjara)बंजार समाजाची व्याख्या बदलणारा माणूस. नियतीनं त्यांना सर्वच भरभरून दिलं. पैसा, बुद्धी आणि आयुष्यसुद्धा. तब्बल १०० वर्ष जगणारा बंजारा व्यापारी त्याकाळचा आशिया खंडातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता. गुरु गोविंद सिंहाचा समकालीन असणाऱ्या लख्खीराय कडे इतिहासाने म्हणावा इतका प्रभाव टाकला नाही. पाठीवर बिर्हाड बांधून देशभर भटकंती करणारा समाज म्हणजे बंजारा समाज अशी या समाजाची ओळख लख्खीराय नं पुसली होती.

सध्याच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरनगरमध्ये त्यांचा जन्म झाला, १५८० मध्ये. अकबराच्या काळापासून मुघलांना सैन्य पुरवठा लख्खीराय चं कुटुंब करत होतं. नंतर जेव्हा लख्खीराय कडं व्यापार आणि व्यवसायाची सुत्रं आली तेव्हा कुणी विचारही केला नसेल इतका पैसा त्यानं कमावला होता. याच दौलतीच्या जोरावर आशिया खंडातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्यानं ख्याती कमावली होती. कापूस, चुना, शस्त्रांत्रांची ने-आण करणं या गोष्टी लख्खीराय करत होता. आशियातल्या बऱ्याच मोठ्या भागातला व्यापार लख्खीरायच्या सहभागामुळं अधिक सुरळीत व्हायचा. आशिया खंडाचं व्यापारी नाक त्यावेळी एका बंजारा समाजातल्या माणसाकडं होतं.त्याच्याकडं चार तांडे होते. त्याच्या संरक्षणासाठी १ लाख सैन्यही त्यानं उभारलं होतं. शिवाय एकूण २० हजार बैलगाड्या होत्या.

लख्खीरायचा तांडा विसावला की सपाट उनाड माळ गावात बदलायचं. त्याच्या व्यापारी मार्गावर त्यानं बरीच विहरी बांधल्या, धर्मशाळ्या उभारल्या, तळी खोदली होती. मुघलांना त्यानं पुरवलेल्या सेवेवर खुश होऊन दिल्लीतली मालदा, बहारखंबा आणि नरेला ही चार गावं मुघलांनी त्यांना इनाम दिली होती. शिवाय दिल्लीची शान मानला जाणारा लाल किल्ला उभारण्यातही लख्खीराय यांच योगदान राहिलं. ते या किल्ल्याचे कॉंट्रेक्टर होते. मुघल दरबारात त्यांच्या शब्दाला मान होता. जगातला सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जाणारा लोहगड किल्ला जो सध्या हरियाणात आहे तो लख्खीराय बंजारा यांच्याकडे होता. नंतरच्या काळात शीखांच्या लढ्यात मोठी मदत या किल्ल्यानं केली असल्याच्या नोंदी इतिहासात आहेत.

गुरु गोविंद सिंहांचा सहवास

लख्खीरायांच ऐश्वर्य आणि मुघल दरबारातला वट यामुळं विशेष करुन मुघल फौज त्यांच्या भागात पाय ठेवायची नाही. याचा फायदा मुघल विरोधी लढ्यासाठी गुरु गोविंद सिंहांनी(Guru Gobind Singh) करुन घेतला. पंजाब आणि हरियाणा भागात शिख चळवळ मजबूत व्हायला लागली. काहीच दिवसात गुरु गोविंद सिंह आणि लख्खीराय एकमेकांच्या संपर्कात आले. गुरु गोविंद सिंहाचे विचार पटल्यामुळं नंतरच्या काळात लख्खीराय यांनी शिख धर्माप्रमाण जीवन शैली जगायला सुरुवात केली. खालसा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून लोहगड उभं राहिलं. मुघलांच्या डोळ्यात हे खुपनार नव्हतं तर नवल.

शीख आणि मुघलांच्यात संघर्ष वाढायला लागला. औरंगजेब गादीवर असल्यामुळं तो अधिक तीव्र होता होता. नंतर औरंगजेबने दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहाद्दुर यांच शीर कलम केलं. ही खबर मिळताच लख्खीराय यांनी दिल्लीकड कुच केली. त्यावेळी त्यांच वय ९० वर्षांच्या पार होतं. पुढं त्यांच्या शिरिराची विटंबना होणार नाही याची पुर्ण काळजी त्यांनी घेतली.लख्खीरायांचा ९० वर्षाचा असातनाही पराक्रम पाहून त्यांनी मुघलांना पळवून लावलं.

तेगबहादुर यांच्या शरिराची विटंबना होण्यापासून वाचवलं. यानंतर लख्खीराय यांनी त्यांच्या गुरुच शीर जगजीवन राम यांच्याकडे दिलं. तेग बहाद्दुर यांच पार्थिव लख्खीरायांनी स्वतःच्या घरी ठेवलं. आणि संपुर्ण घर पेटवून त्यांनी अंतिम संस्कार पार पाडले. पुढं याच जागेवर गुरुद्वारा उभा राहिला. वयाच्या १०० व्या वर्षी लख्खीरायाचं निधनं झालं त्यांच्या मुलांनी शिख धर्माचा प्रचार आणि प्रसार केला इतकचं नाही तर आनंदपुरच्या युद्धात लख्खीराय यांचे तीन पुत्र गुरु गोविंद सिंहासोबत लढले आणि शहिद झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button