जगातील सर्वांत श्रीमंत जोडपे झाले ‘विभक्त’ ! बिल गेट्स आणि मेलिंडा यांच्याकडून घटस्फोटाची घोषणा

bill gates - melinda gates - Maharashtra Today

मुंबई :- मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती असा परिचय असलेले बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्वतः बिल गेट्स यांनी ट्विटरवर माहिती दिली .

बिल आपल्या ट्विट म्हणाले की, दीर्घ चर्चा आणि वैवाहिक नातेसंबंध यांचा विचार करून आम्ही वैवाहिक जीवन संपविण्याचे ठरविले आहे. गेल्या २७ वर्षांत  आम्ही आमच्या तीन मुलांना व्यवस्थित सांभाळून त्यांना मोठे केले आहे. आम्ही दोघांनी मिळून एका फाउंडेशनची स्थापना केली आहे आणि त्यातून जगभरातील लोकांना आरोग्यपूर्ण आणि चांगले जीवन मिळावे यासाठी मदतीचा हात दिला जातो. आम्ही घटस्फोट घेत असलो तरी या फाउंडेशनचे काम एकत्र करणार आहे.

पती-पत्नीचे नाते संपवून नवीन जीवनाची सुरुवात करताना बिल यांनी त्यांच्या कुटुंबाचे खासगीपण अबाधित राहावे अशी विनंती लोकांना केली आहे. बिल आणि मेलिंडा यांची ओळख १९८७ मध्ये झाली होती. न्यूयॉर्क एक्स्पो ट्रेड मेळ्यात बिल यांनी मेलिंडा यांना कार पार्किंगमध्ये डेटिंगसाठी विचारले होते तेव्हा मेलिंडा यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र बिल यांनी चिकाटीने मेलिंडा यांचा पाठपुरावा केल्यावर अखेर १९९३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केले  आणि १९९४ च्या नववर्षदिनी लग्न केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button