बंदर विभागाचा महसूल घटला

ratnagiri revenue-of-the-port

रत्नागिरी : रत्नागिरी गटातील बंदरांवर (port department) येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या जहाजांवरील मालातून मिळणारा बंदरविभागाचा महसूल कोरोना (Corona) काळात सुमारे 65 टक्क्यांनी (65%) घटला आहे. कोरोना काळातील मागील सहा महिन्यांत अवघा 60 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी वर्षभरात 3 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या बंदरांचा गटनिहाय समावेश झालेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही बंदरे वेंगुर्ले गटात गेली आहेत. रत्नागिरी गटामध्ये 9 बंदरे येतात. यामध्ये रत्नागिरीतील फिनोलेक्स, अल्ट्राटेक, वरवडे, जयगड, दाभोळ, बोऱ्या, पालशेत, हर्णे, केळशी, बाणकोट या बंदरांचा समावेश असल्याचे बंदर निरीक्षक शंकर महानवर यांनी सांगितले. रत्नागिरीतील पूर्णगड आणि जैतापूर ही बंदरे वेंगुर्ले गटात गेली आहेत.

बंदरांवर मालवाहतूक जहाजातून येणारा माल किंवा या जहाजांतून पाठवल्या जाणाऱ्या मालाचे शुल्क म्हणजेच माल चढणावळ आणि उतरणावळ शुल्क, बंदर करातून शासनाला महसूल मिळतो. याचे शासकीय दर निश्चित आहेत. पाईपसाठी लागणारा कच्चा माल (व्हीएलएम), कोळसा, इथिलीन आदी वस्तूंची या बंदरांमधून वाहतूक होते. काही वर्षांपूर्वी गॅसही येत होता. परंतु, मगॅस येणे बंद झाले आहे. परिणामी बंदरातून होणारी उलाढाल गेल्या सहा महिन्यात झाली आहे. याचा स्थानिक बाजारपेठेवर ही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER