पावसाचा परतीचा प्रवास झाला सुरू

The return journey of the rains began

पुणे :- पावसाने दिलेली उघडीप, वाऱ्यांची बदललेली दिशा, हवेतील ओलावा (आद्र्रता) कमी झाल्याने मोसमी पाऊस वायव्य भारतातून परतला आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास वेगाने होत आहे. देशभरातून गेल्या पाच दिवसांपासून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांतून मोसमी पाऊस परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. आजपासून पश्चिम राजस्थानातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे.

कोकण (Konkan) आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. पुढील २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडय़ामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER