निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल – फडणवीस

Devendra Fadnavis

नागपूर : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

“महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे. त्यामुळे निकालानंतर चांगलं यश प्राप्त होण्याचा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते. या परीक्षेत आम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ, असा विश्वास आहे. विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसतं, पण त्याच्यावर परिणाम नक्कीच पाहायला मिळेल” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

“सुशिक्षित सुजाण मतदारांनी लोकशाही मजबूत केली पाहिजे. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा” असं आवाहन फडणवीसांनी केलं.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. नागपूर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे (BJP) संदीप जोशी (Sandip Joshi) आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडूनही (Congress) नव्या दमाच्या अभिजीत वंजारी (Abhijeet Wanjari) यांना संधी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER