अनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा

Unlock 5.0

कोरोनामुळे (Corona) राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. राज्य सरकारनं अनलॉक-५ (Unlock -5) संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनंच सुरू ठेवावे लागतील. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यांना क्यूआर कोड देण्यात येणार आहे. नियमांच्या अधीन राहूनच त्यांना प्रवास करता येणार आहे. राज्यांतर्गत असलेल्या रेल्वेगाड्या सुरू करण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वेसेवा तत्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER