एका ठरावाचे दोन ठराव करुन संपूर्ण शैक्षणिक भुखंडच खाजगी ट्रस्टच्या घशात घालण्याचा प्रताप

ठाणे :- ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील काही भुखंड हे शैक्षणिक संस्थेना देण्याचे प्रयोजन आखले होते. त्यानुसार कासारवडवली भागात सिध्देश चॅरीटेबल ट्रस्टला 3300 चौ. मी. क्षेत्रचा भुखंड देण्याबाबातचा ठराव महासभेत झाला होता. तर उर्वरीत भुखंडावर महापालिकेची शाळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार तसा ठराव करण्यात आला होता. मात्र काही दिवसातच या ठरावात फेरबदल करुन तब्बल 5 हजार 684 चौ.मी. क्षेत्रफळाचा संपूर्ण भुखंडच संबधींत संस्थेच्या घशात घालण्याचा दुसरा ठराव करण्यात आला असल्याचा गंभीर बाब सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक नरेश मणोरा यांनी मंगळवारी झालेल्या महासभेत उघड केली.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणीतरी असेल

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 9 भुखंड हे शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार घोडबंदर भागात कासारवडवली येथे मे. सिध्देश चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेला कासारवडवली येथील 5 हजार 684 चौ. मी. क्षेत्रफळापैकी 3300 चौ.मी. क्षेत्रफळाचा भुखंड देण्यात यावा अशी सुचना तेव्हाच्या महासभेत मांडण्यात आली होती. अशी माहिती यावेळी मणोरा यांनी दिली, तसेच उर्वरीत 2384 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडावर पालिकेची शाळा उभारण्यात यावी अशी मागणीही त्यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार तसा ठराव करण्यात आला होता.

दरम्यान पहिला ठराव अशा आशयाचा झाल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी अचानक त्या ठरावातील शेवटचा पॅरा काढण्यात येऊन त्याठिकाणी या भागातील संपूर्ण भुखंडचा संबधींत संस्थेला देण्याचा ठराव करण्यात आला. त्यावर महापौर आणि इतर सदस्यांच्या स्वाक्ष:यासुध्दा झाल्या असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हा ठराव बदलला कसा असा सवाल उपस्थित करुन त्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन ठराव झाले नसल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने सचिव अशोक बुरपुल्ले यांनी केला. दुसरा ठराव हा बनाव असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या विभागाकडून एकच ठराव झाला होता, दुसरा ठराव झाला असेल तर त्याच्या ओरीझनल कॉपी सादर करण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. यावर मणोरा यांनी माङयाकडे दोन्ही ठरावाच्या ओरीजनल कॉपी असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासन अचानकपणो तोंडघशी पडल्याचे दिसून आले. एकूणच या प्रकरणावर सारवासारव करीत, या संदर्भात योग्य तो तोडगा काढला जाईल आणि महापालिकेची शाळा उभारण्यात येईल असे आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. त्यानंतर सभागृहातील गोंधळ शांत झाला.

ही बातमी पण वाचा : …आणि शिवसेना नगरसेवकाने ऍम्बुलन्समध्ये येवून बजावला मतदानाचा हक्‍क