सुटका केलेल्या अल्पवयीनेला पुन्हा कुंटणखान्यात धाडले

सेवनिवृत्त पोलीस अधिकार्‍याला अटक

Minor girls

मुंबई :- कामाठीपुर्‍यातून सुटका केलेल्या तीन अल्पवयीन मुलींना पैशांसाठी एका सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षकाने पुन्हा कुंटणखाण्यात धाडल्याचा धक्कादायक प्रकार 14 वर्षांनी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी कलंदर शेख (68) याला नागपाडा पोलिसांनी औरंगाबादमधून तर त्याचा साथिदार रवींद्र पांडे याला कामाठीपुर्‍यातून बेड्या ठोकल्या आहेत. घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : वेश्या व्यवसायामुळे लॉजवर छापा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2004 साली कामाठीपुरा येथे छापा टाकून तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेख याच्या नेतृत्वातील पथकाने 13 ते 14 वर्ष वयोगटातील तीन मुलींची समाजसेवा संस्थेच्या मदतीने सुटका केली होती. या मुलींची रवानगी बालसुधार गृहात करणे गरजेचे होते. मात्र शेख याने मुलींना पून्हा कामाठीपुर्‍यातील दलाल रवींद्र पांडे (60) याच्या मदतीने कुंटणखाना चालविणार्‍या मीरा तमंग हिच्या हवाली केले. त्या मुली वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती त्या संस्थेला मिळाली. संस्थेने घडल्याप्रकाराबाबत पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळवले. वरिष्ठांच्या आदेशाने समाजसेवा शाखेने सापळा रचून त्या मुलींची पून्हा तेथून सुटका केली. पोलीस तपासात शेख याचे हे कृत्य उघड झाले होते. मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर 14 वर्षांनी याप्रकरणात शेख याला अटक करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : भारतात या ठिकाणी सुनेला वेश्याव्यवसाय करणे आहे बंधनकारक !