कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत होम होम क्वारांटाईन केलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह

Corona Positive

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत होम होम क्वारांटाईन केलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या अक्षम्य बेफिकिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईहून आलेली एक महिला व तिच्या दोन मुलांना आराम कॉर्नर परिसरातील घरीच होम क्वारांटाईन करण्यात आले होते. काल गुरुवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हडबडलेल्या प्रशासनाने आज शुक्रवारी सकाळी परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र आजूबाजूचे नागरिक तसेच स्थानिक नगरसेवकाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोंनाची प्राथमिक लक्षणे दिसतात. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करा, अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

परिणाम अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या आराम कॉर्नर परिसरात आता भीतीचे सावट पसरले आहे. एक महिला व तिची दोन मुले चार दिवसापूर्वी मुंबईहून आराम कॉन्नर परिसरातील घरी राहावयास परतले. तेव्हाच आजूबाजूच्या नागरिकाने प्रशासनाला याची कल्पना दिली.

स्थानिक नगरसेवक ईश्वर परमार यांनीही या कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरण करावे, अशी मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन दिवसापूर्वी या तिघांचे घशातील स्वबचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा काल रात्री अहवाल आला. तो पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. ही महिला व तिच्या मुलांना तात्काळ सीपीआरमधील कोरोनाव्हायरस बाधित रुग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला