औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय नसून श्रद्धेचा विषय – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे :- औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ येताच औरंगाबादचं नामांतर करण्यासंबंधी सध्या शिवेसना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) समितीसमोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल असं प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळसाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे नामांतरासाठी नेहमी आग्रह धरणारी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावरुन टीका केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवायला पाहिजे. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहण्यात आला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण ; चंद्रकांतदादा लिहिणार थेट रश्मी ठाकरेंना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER