आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळले जाणार; बीसीसीआयचा निर्णय

IPL - Maharashtra Today

मुंबई :- सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल-२०२१ च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Sukla) यांनी याबाबतची माहिती दिली. आयपीएलचे ३१ सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

मागील वर्षी म्हणजेच आयपीएल-२०२० ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. यंदा मात्र आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. कोरोनाची (Corona) दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा ४ मे रोजी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने कधी होणार याची उत्सुकता होती.

अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे सामने यूएईला खेळले जाणार असल्याचं स्पष्ट केलं. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button