जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता, मात्र … – तेजस्वी यादव यांचा आरोप

Tejasvi Yadav

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीलाच लोकांनी कौल दिला. मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या (NDA) बाजूने होता. त्यामुळे ते जिंकले, असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी केला. तेजस्वी पत्रपरिषदेत म्हणालेत, भाजपाने असं  करण्याची ही पहिली वेळ नाही.

२०१५ मध्ये महाआघाडी (mahagathbandhan) स्थापन झाली त्या वेळीही जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता; मात्र भाजपाने मागच्या दाराने प्रवेश करून सत्ता मिळवली. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहार निवडणुकीचे निकाल परवा जाहीर झाले.  एनडीएला बहुमत मिळाले.

एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मतमोजणीच्या दरम्यान एनडीए आणि महाआघाडीत चांगलीच चुरस होती. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत, असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : तेजस्वी भविष्यात बिहारचे नेतृत्व करू शकतात – उमा भरती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER