पैसे कसे उभे करायचे हा केंद्राचा प्रश्न : मुख्यमंत्री ठाकरे

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी होते. जिल्हाधिकारी राज्य शासनाकडे पाठपुरावा करतात. राज्य शासन केंद्राकडे निधी मागते. हीच पध्दत आहे. आता केंद्राने पैसे नाहीत, म्हणून हात वर करुन चालणार नाही. पैसे कसे उभे करायचे हा केंद्राचा प्रश्न आहे. आम्ही मागणी करत राहणार, असे प्रतिप्रादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज केले.

राज्यातील दुर्गम भागात असलेला रुग्णाला त्याच्या गावातून थेट पुणे-मुंबईत बसलेल्या डॉक्टरांकडून ऑनलाईन उपचार घेता येतील. ही शिव आरोग्य सेवा लवकरच राज्यात सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधांची सोय केली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून झाला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘शिव आरोग्य सेवा’ज्यात राज्यातील दुर्गम भागातील डॉक्टर मुंबईतील तज्ञांशी टेलिमेडिसिन सुविधेद्वारे त्यांच्या रूग्णांचे निदान व उपचाराविषयी चर्चा करतील. यापूर्वी २०१४ मध्ये ही योजना पालघर आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी राबविली होती. कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राज्यभर राबविण्याचा विचार आहे. टेलिमेडिसिन सुविधेद्वारे मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी परदेशातील तज्ज्ञांनाही आणण्याचा प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER