काश्मिरात ठेवलेली पैगंबाराची निशाणी चोरीला गेली आणि भारत- पाकिस्तानात भुकंप आला?

Maharashtra Today

साठच्या दशकात काश्मिरच्या राजकारणात मोठा भुकंप झाला. ‘काश्मिर षडयंत्र’ केसमध्ये शेख अब्दुल्लाह यांना तुरुंगवास झाला. त्यांच्या ऐवजी बख्शी गुलाम महम्मद यांना काश्मिरचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं. यानंतर जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी ‘कामराज प्लॅन’ लागू केला. यानूसार देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात आली. यात काश्मिरही सामील होतं. ४ ऑक्टोबर १९६३ ला बख्शींच्या जागेवर ख्वाजा शमशुद्दीन(Khwaja Shamsuddin) काश्मिरचे नवे मुख्मंत्री झाले. शमशुद्दीन पदावर येऊन दोन महिनेच झाले होते की काश्मिरमध्ये अशी घटना घडली ज्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तान दोन्ही राज्यांमध्ये उमटले.

या घटनेमुळं भारतासह पाकिस्तानाचं राजकारणही ढवळून निघालं. या प्रकरणाचं कोडं सोडवणाऱ्या सहकाऱ्याला नेहरु म्हणाले होते, “आज तुम्ही भारतासाठी काश्मिर वाचवलाय.” अशी कोणती घटना होती ज्यामुळं कराचीपासून दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटले होते?

‘मु-ए-मुकद्दस’

मुस्लीम समुदायामध्ये ‘मु-ए-मुकद्दस’ पवित्र मानलं जातं. हजरत मोहम्मद साहेबांची निशाणी म्हणून त्यांच्या दाढीच्या किंवा डोक्याच्या केस म्हणून मुस्लीम लोक याच्याकडे श्रद्धेने पाहतात.

मोहम्मद पैगंबरांच्या या पवित्र आवशेषाला १६३५मध्ये ‘सईद अब्दुल्ला’ यांनी मदिनामधून भारतात आणलं होतं. ते पैगंबारांच्या वंशजांपैकी एक होते. कर्नाटकाच्या एका मशिदीमध्ये मु-ए-मुकद्दस ठेवण्यात आला. नंतर काश्मिरच्या एका व्यापाराच्या हाती ही पवित्र गोष्ट आली. औरंगजेब मुघलांच्या गादीवर होता तोच हा काळ. ही खबर औरंगजेबाच्या कानी आली. त्यानं अजमेरच्या ‘मैनुद्दीन चिश्ती साहब’ दरग्यात पैगंबराची ही निशाणी ठेवली.

यानंतर १७०० साली पुन्हा काश्मिरमध्ये मु-ए-मुकद्दस ठेवण्यात आला. दरग्याचे संरक्षक याची रक्षा करत होते. श्रद्धाळू लोक याचं दर्शन घेत असत. देशभरातून लोक काश्मिरला ‘मु-ए-मुकद्दस’च्या दर्शनासाठी यायचे.

२७ डिसेंबर १९६३ साली मोहम्मद साहेबांची ही निशाणी चोरी झाली. रात्री दोनच्या आसपास मु-ए-मुकद्दस चोरण्यात आला. खबर संपूर्ण काश्मिरात पसरली. लोकांच्या अस्थेचा प्रश्न होता. भारताच्या राजकारणात आधीच मोठी उलथा पालथ सुरु होती.

हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरला

पुढच्याच दिवशी काश्मिरात याच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोगोजागकांनी जाी विरोध सुरु केला. तब्बल ५० हजाराहून अधिक लोग दरग्या जवळ जमले. काळे कपडे आणि काळे झेंडे घेऊन श्रद्धाळू लोक विरोध करत होते. बक्शी नेहरुंच्या भेटीला दिल्लीला आले. मुख्यमंत्री शमशुद्दीन यांनी जम्मु सोडला नव्हता. त्यांच्यापर्यंत जेव्हा ही खबर गेली तेव्हा ते तडक दरग्याच्या दिशेने रवाना झाले. यात त्यांना प्रचंड विरोध झाला.

कसा तरी रस्ता काढत ते दरग्यापर्यंत पोहचले. चोरांना पकडणाऱ्याला १ लाख रुपये रोख रक्कम आणि दरमाह पाचशे रुपयांची पेन्शन देण्याची घोषणा त्यांनी केली. १९६० साली १ लाख रुपये मोठी रक्कम होती. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या दोन ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांना बोलवलं. संपूर्ण भारत पैगंबराची शेवटची निशाणी मिळावी म्हणून दुआ मागणं सुरु होतं.

पाकिस्तानातही याचे पडसाद उमटले. जिन्नांच्या कबरीवर लाखोंनी मोर्चा नेला. प्रकरण हातातून बाहेर जाण्याची चिन्ह निर्माण झाली होती. शेकडो लोक तिथं मरण पावले. अनेकांनी स्थलांतर केलं. तिथल्या माध्यमांनी व राजकीय नेत्यांनी या घटनेचा उल्लेख पाकिस्तानी मुस्लीमांचं षडयंत्र असं केलं. भारतातील मुस्लीमांमध्येही दहशतीच वातावरण होतं.

लोकांच्या प्रार्थना मान्य झाल्या

प्रकरण शांत होत नव्हतं. नेहरुंनी त्यांचा खास माणूस काश्मिरला पाठवला. याआधी सी.बी.आय.च्या प्रमुखांना काश्मिरात पाठवण्यात आलं होतं. काश्मिरच्या दरग्याला भेट देऊन पैगंबरांचा शेवटचा आवशेष मिळावा ही शास्त्रींनी प्रार्थना त्यांनी केली.

या दरम्यान ‘नॅशनल कॉन्फर्न्स’ शेख अब्दूलांच्या सुटकेची मागणी करु लागली. समर्थकांनी विरोध प्रदर्शन सुरु केलं. १९६४ साली शेख अब्दूला सुटले.

४ फेब्रुवारी १९६४ ला लोकांच्या प्रार्थना कबुल झाल्या. रेडीओवर राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री शमशुद्दीन यांनी पैगंबरांचा शेवटचा अवशेष मिळाला असल्याचं जाहीर केलं. काश्मिरसह देशभरात आनंदाचं वातावरण होतं. बातमी नेहरुंपर्यंत गेली. पण हा अवशेष नकली असल्याचं काही जणांच म्हणनं होतं. शास्त्रींच्या उपस्थीतीत ‘सुफी मिराक शाह कशानी’ यांना बोलवण्यात आलं. तेच याची पारख करु शकत होते. त्यांच्या निर्णयाकडं नेहरु, शास्त्रींसह देशाच लक्ष होतं. देश आणि काश्मिरचं भविष्य ते ठरवणार होते. त्यांनी दिर्घ श्वास घेतला आणि तो अवशेष पैगंबरांचाच असल्याचं त्यांनी सांगितलं. काश्मिरात आनंदोत्सवाला सुरुवात झाली.

ही चोरी कुणी केली यावरुन आजही पर्दा उठलेला नाही. शेकडो लोकांचा जीव गेल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. वेळेत प्रकरण मिटल्यामुळं अनेकांचे जीव वाचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button