कॅटरीनाची डुप्लिकेट म्हणून निर्माते काम देत नव्हते, झरीन खानचा खुलासा

Katrina Kaif - Zareen Khan

बॉलिवुडमध्ये (Bollywood) काही नायिका जवळजवळ सारख्याच दिसतात. परंतु या सारखेपणामुळेच नंतर आलेल्या नायिकेला सिनेमात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे अशा नायिकांनी काम मिळत नसल्याने नंतर बॉलिवुडमधून एक्झिट करणेच उचित समजले. ऐश्वर्या राय, कॅटरीना (Katrina Kaif) यांच्यासारख्या दिसणाऱ्या नायिकांना ऐश्वर्याचा कधी काळी बॉयफ्रेंड असलेल्या सलमान खाननेच लाँच केले होते. पण सलमानच्या सिनेमाव्यतिरिक्त त्यांना कोणीही जास्त संधी दिली नाही. कॅटरीनासारखी दिसणाऱ्या झरीन खानचेही असेच झाले. कॅटरीनाची डुप्लिकेट म्हणून निर्मात्यांनी काम न दिल्याचे झरीन खानने (Zareen Khan) नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीनाचे प्रेम प्रकरण ऐन फॉर्मात होते. मात्र नंतर कॅटरीना काही कारणांमुळे सलमानपासून दूर गेल्याने सलमान नाराज झाला होता. त्याचवेळी सलमानने ‘वीर’ सिनेमाची योजना आखली होती. या सिनेमात कॅटरीनालाच तो नायिका बनवणार होता. पण ती दूर गेल्याने त्याने कॅटरीनासारखी दिसणाऱ्या झरीन खानला सिनेमाची नायिका बनवले. 2010 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाची कथा स्वतः सलमान खाननेच लिहिली होती आणि दिग्दर्शन केले होते अनिल शर्माने. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.

यानंतर झरीन खानला काही मोठे सिनेमे मिळाले खरे पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. झरीनने वेळोवेळी याची खंत व्यक्त करून दाखवली होती. झरीन चांगली अभिनेत्री असली तरी तिची ओळख नेहमीत कॅटरीनाची डुप्लीकेट अशीच झाली होती. कॅटरीनाची डुप्लीकेट म्हटले जात असल्याने झरीन खूप नाराज होत असे आणि तिला रागही येत असे. झरीनने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिची तुलना कॅटरीनाशी करण्यात आल्याने ती खूपच रागावली होती. आणि आता तरी मला कॅटरीनाची डुप्लीकेट म्हणण्याचे बंद करा असे तिने म्हटले होते. एवढेच नव्हे तर कॅटरीनाची डुप्लिकेट अशी ओळख झाल्यानेच आणि एखाद्या डुप्लीकेटसोबत काम करण्यास निर्माते आणि नायक तयार नसल्याने निर्माते मला काम देत नव्हते. या शब्दात नाराजीही व्यक्त केली होती.

झरीनने म्हटले होते, कॅटरीना तेव्हा स्टार झाली होती आणि मी सुरुवात करीत होती. मला कॅटरीनाची डुप्लिकेट म्हटले जात असले, मला राग येत असला, निराश होत असली तरी मी हार मानली नाही. संघर्ष सुरुच ठेवला होता. बॉलिवुडमध्ये अशी तुलना नेहमीच केली जाते. प्रीती झिंटाची तुलना अमृता सिंहसोबत तर अमीषा पटेलची तुलना नीलमसोबत केली जात होती. परंतु त्यांचे नशीब चांगले होते त्यामुळे त्यांना काम मिळाले असेही झरीन म्हणाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER