महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची समस्या ही आहे की, मी त्यांच्या मुलाला अडकवले; कंगनाचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray & Kangana Ranaut

मुंबई : आमचा कंगना प्रकरणाशी काही संबंध नाही असे शिवसेनेने (Shivsena) जरी जाहीर केले असले तरी, कंगना काही या वादातून मागे हटायला तयार नाही असे दिसते. कंगना रणौत आज मुंबईमधून चंदीगढला गेली आहे. आपल्याला सतत धमक्या व घाबरवण्याचा प्रयत्न होत असल्याने ही मॉुंबई आता सुरक्षीत वाटत नाही असे म्हणत कंगना आज चंदीगढला पोहचली. त्यानंतरही कंगनाने शिवसेना व मुख्यमंत्री ुद्धव टाकरे तसेच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप करणे सुरूच ठेवले आहे.

ट्विट करत तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व थेट नाव गेऊन आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे.

मी या सगळ्यांचे हे उद्योग उघड केल्यानेच ते मला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पाहूया नेमकं कोण जाळ्यात अडकतं ते असंही कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER