
मुंबई :- राज्यात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांतून अव्वाच्या सव्वा बिल देत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक आता घाटकोपरमधल्या रिअल इस्टेट एजंटचे खासगी रुग्णालयानं अव्वाच्या सव्वा बिल काढल्याची घटना घडली आहे.
घाटकोपर येथील एका रिअल इस्टेट एजंटवर ठाण्यातल्या खासगी रुग्णालयानं तब्बल १८ लाख रुपयांचे बिल आकारले आहे. १८ लाखांचं बिल दिल्यानं त्यांना आपल्या मित्रांकडून जवळपास नऊ लाखांचे कर्ज घ्यावे लागले. माहितीनुसार, घाटकोपरच्या या कुटुंबीयांनी कोविड-१९ वर रुग्णालयात उपचार घेतले. या कुटुंबाचा नऊ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा होता. मात्र ठाण्यातल्या या रुग्णालयानं त्यांच्याकडे १८ लाख रुपयांचं बिल थोपवलं.
असल्फा घाटकोपर पश्चिम येथील ३९ वर्षीय रिअल इस्टेट एजंटला अन्नदान करत असताना संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांतील त्यांची ६५ वर्षांची आई, पत्नी, सहा वर्षांची मुलगी, पत्नीची बहीण, तिचा मुलगा आणि त्यांची स्वतःची बहीण आणि पुतणे या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले. इस्टेट एजंट आणि त्यांची पत्नी वगळता कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला