पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची राज्यपालांकडून घेतली माहिती

PM Narendra Modi - Jagdeep Dhankhar - Maharashtra Today
PM Narendra Modi - Jagdeep Dhankhar - Maharashtra Today

दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत भाजपानं (BJP) चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्याशी फोनवरून चर्चा करून बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचला आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा करताना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे, असे त्यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजपा समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपासोबतच डाव्या पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) हिंसाचाराचा आरोप केला आहे, हे उल्लेखनीय.

ममतांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवले आहे. २ मे रोजी निकाल लागल्यानंतर कोलकातामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकार्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button