पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी फेकाफेकीचे राजकारण केले; आता त्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक

Nawab mailk - PM - Amit Saha - Maharashtra Today

गोंदिया : “देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. यावर अमित शाह म्हणाले की, “जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हा आम्ही राजीनामा देऊ.” आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. मोदी आणि शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या ३ वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार २०० पार, असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केले. आता निवडणुकीच्या निकालाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.” असे नवाब मलिक म्हणाले

नवाब मलिकांचा गोंदिया दौरा

अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान आज त्यांनी ग्रामीण कोविड रुग्णालय सडक अर्जुनीला भेट दिली. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान क्रीडा संकुल गोंदिया आणि केटीएस सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांबाबत आणि खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर निवडणुकीच्या निकालांवर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली.

बंगालमध्ये कोण विजयी ?

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. सध्या तृणमूल काँग्रेस २०९ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. बंगालमधील नंदीग्राम या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढली. ही निवडणूक शेवटपर्यंत अटीतटीची राहिली. अखेर ममता बॅनर्जी ३ हजार ७२७ मतांनी विजयी झाल्या. दुसरीकडे या निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांना कमी जागा मिळताना दिसत आहेत. बंगालमध्ये काँग्रेस दोन तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button