पंतप्रधानांनी ‘त्या’ भाजपा कार्यकर्त्याचेच पाय धरले!

PM Modi - Maharastra Today

पश्चिम बंगाल :- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याही प्रचार सभा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत. मोदींच्या प्रचार सभेत एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी व्यासपाठीवर असताना एक भाजपा कार्यकर्ता मोदींच्या पाया पडण्यासाठी पुढे आला. त्याच वेळी मोदींनी त्या कार्यकर्त्याचेच पाय धरले. याचा व्हिडीओ भाजपाने ट्विट केला आहे.

पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक भाजपा मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. याबाबत भाजपाने ट्विट केले, “भाजपा एक अशी सुसंस्कृत संघटना आहे की, जिथे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल सन्मान आणि आदर आहे. त्यातला एक भाजप कार्यकर्ता उठला आणि मोदींना नमस्कर करत पाया पडला. त्याच वेळी मोदींनीही या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER