पंतप्रधान आणि राज्यपालांना बॅनर्जींची पाहावी लागली अर्धा तास वाट; ‘यास’ चक्रीवादळग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर

PM Modi And Governor Dhankhar Waited For 30 Min For Mamata Banerjee

कोलकाता : दोन दिवसांपू्र्वी यास चक्रीवादळामुळे (Yaas Cyclone) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. त्यांनी एका आढावा बैठकीत भाग घेतला. या बैठकीत नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना जवळपास ३० मिनिटे वाट पाहावी लागली. सूत्रांनुसार, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची ३० मिनिटे वाट पाहिली.

राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी ट्विट केले की, संघर्षाची ही प्रवृत्ती राज्य किंवा लोकशाहीच्या हिताची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग न घेता घटनात्मकता किंवा कायद्याचा नियम लागत नाही. दुसरीकडे, बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी दिघाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याविषयी माहिती दिली होती. बंगालमधील आढावा बैठकीत भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांना मिळालेल्या आमंत्रणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे आधीच सांगितले होते.

बॅनर्जी म्हणाल्या की, “हिंगलगंज आणि सागर येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कालैकुंडा येथे भेटले आणि त्यांना पश्चिम बंगालमधील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्ती अहवाल सादर करण्यात आला आहे. आता दिघामधील मदत व जीर्णोद्धार कामांचा आढावा घेण्यासाठी पुढे जात आहे.”

‘यास’ चक्रीवादळग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘यास’मुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. केंद्राने तातडीने एक हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. यात ओडिशाला ५०० कोटी आणि पश्चिम बंगाल-झारखंडला ५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button