पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्याच्या मागणी मान्य, इतर राज्याच्या तुलनेत रेमडेसिवीरचा जादा पुरवठा

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi - Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने रेमडेसिवीरचा (Remdesivir) अधिक प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली ही मागणी पंतप्रधान मोदींनी मान्य केली असून, देशातील इतर राज्याच्या तुलनेत रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत महाराष्ट्राला ४,३५,००० रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

गेले महिनाभर राज्यातील करोना रुग्णांमध्ये रेमडेसिवीर मिळण्यावरून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिविरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिविर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढायला लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिवीर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवदीप रिनवा यांनी २४ एप्रिल रोजी राज्य सरकारला पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी महाराष्ट्राला रेमडेसिविरचा जो साठा देण्याचा निर्णय घेतला होता त्याचा नव्याने आढावा घेतला असून महाराष्ट्राला ४,३५,००० हजार रेमडेसिवीर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राला २,५९,२०० रेमडेसिवीर मंजूर केले होते. . देशातील सात प्रमुख रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या ११ लाख रेमडेसिविरचा आढावा घेऊन यापूर्वी २१ एप्रिल ते ३० एप्रिलसाठीचे वाटप करण्यात आले होते. मात्र नव्याने यात वाढ होऊन सर्व कंपन्यांकडून १६ लाख रेमडेसिविर उपलब्ध झाल्यामुळे नव्याने सर्व राज्यांच्या रेमडेसिविर मागणीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व राज्यांसाठी नव्याने रेमडेसिविर पुरवठ्याचे फेरवाटप करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्राला २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीसाठी ४,३५,००० रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुजरातला १,६५,००० रेमडेसिविर मंजूर करण्यात आले असून उत्तर प्रदेशला १,६१,०००, दिल्ली ७२,०००, कर्नाटक १,२२,०००, बिहार ४०,०००, आंध्र प्रदेश ६०,०००, राजस्थान ६७,०००, तामिळनाडू ५९,००० आणि मध्य प्रदेश ९५,००० हजार अशाप्रकारे १६ लाख उपलब्ध रेमडेसिवीरचे वाटप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button