जबलपूरमध्ये पिकणाऱ्या एका आंब्याची किंमत तब्बल २ लाख ७० हजार !

Jabalpur - Mango

जबलपूर :- आतापर्यंत आपण महागडा आंबा म्हणून एक तर कोकणातील ‘हापूस’ किंवा मध्यप्रदेशातील इंदूरजवळ पिकणाऱ्या ‘नूरजहाँ’ ओळखत होतो. मात्र जबलपूरमध्ये (Jabalpur) पिकणारा आंबा (Mango) खिसा नव्हे, तर संपूर्ण बँक खातं रिकामं करू शकतो.

आपला विश्वास बसणार नाही, मात्र हे सत्य आहे. जबलपूरमध्ये पिकणाऱ्या एका आंब्याची किंमत तब्बल २.७० लाख रुपये इतकी आहे. इंटरनेटवर सध्या या आंब्याची किंमत एक ते दोन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आंब्याच्या या किमतीबाबत स्थानिक कृषी अधिकारीही चक्रावून गेले असून, त्यांनी आंब्याच्या बगिच्यात जाऊन पाहणी करणार असल्याचं सांगितलं. जपानी आंबा ‘तामागो’ नावानं ओळखला जातो. भारतात इतर कुठेही या आंब्याचं उत्पादन घेतलं जात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच त्याला मिळणारी किंमतही खूप जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वांत महाग विकल्या जाणाऱ्या आंब्याला जपानी भाषेत ‘ताईयो नो तामागो’ म्हणतात. भारतात आंब्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील हापूस आंबा सर्वाधिक महागडा आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जपानचा आंबा सर्वांत महाग विकला जातो. आता तामागो आंब्याचे उत्पादन मध्यप्रदेशातल्या जबलपूरमध्येदेखील होऊ लागले आहे. चरगवामध्ये वास्तव्यास असलेल्या संकल्प परिहार यांनी तामागो आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. संकल्प यांनी चार एकरावर आंब्याच्या १४ विविध प्रजातींची लागवड केली आहे. या बागेत त्यांनी तामागो आंब्याची ५२ झाडं लावली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button